सातारा पोलीसांची कारवाई
रत्नागिरी:- वाई तालुक्यातील खानापुर येथील अभिषेक जाधव या युवकाच्या खुनातील आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रत्नागिरीतील हर्णे येथे ताब्यात घेतले आहे. ३० तासात खानापूरच्या अभिषेकच्या खुनातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
३० तासाचे आतमध्ये तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून कठोर परिश्रम करून एका संवेदनशील गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल पोलीस अधीक्षक सातारा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २ फेब्रुवारी २०२३ ला सायंकाळी ५.०० वा.चे. सुमारास मौजे चांदक, ता. वाई गावचे हददीतून अभिषेक रमेश जाधव, रा. खानापूर ता. वाई याचे ३ इसमांनी अपहरण केले होते. त्याबाबत तो ज्यांच्याकडे वेल्डिंगचे काम करत होता त्यांनी त्याला किडनॅप केल्याबाबत भुईंज पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार, ५५/२०२३ कलम ३६३, ५०६.२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान सदर किडनॅप झालेल्या मुलाचा तसेच संशयीत आरोपींचा भुईज तसेच वाई पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अमलदार यांनी त्यांचे हददीत शोध घेत असताना ३ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ०९.३० वा. च्या सुमारास तो शेंदुरजणे ता. वाई गावचे हद्दीत जखमी अवस्थेत मिळुन आला. त्यास उपजिल्हा रुग्णालयात वाई येथे औषधोपचारकामी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारसाठी साताऱ्याला पाठवले. मात्र उपचारादरम्यान पहाटे ०५.०० च्या दरम्यान अभिषेक जाधवचा मृत्यू झाला.
याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच भुईंज पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने गुन्हयाचा जलदगतीने तपास करताना घटनास्थळाकडे येणारे जाणारे सर्व रस्ते /आरोपींच्या जाण्या येण्याच्या मार्गावरील सीसीटीटी फुटेसपासून सर्वप्रथम गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न केले. आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली असता संशयीत आरोपी है पोलादपुर मार्गे कोकणात गेल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. याप्रमाणे तपास पथकाने गुन्हा घडलेल्या रात्रीपासून रायगड तसेच रत्नागिरी जिल्हयात आरोपीचा शोध घेतला असता दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री सदर आरोपी हे दापोली परिसरात असल्याची गोपनीय माहिती माहिती प्राप्त झाली.
स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास टीमने दापोली परिसरात संपूर्ण रात्रभर कसोशीने शोध घेतल्यांनंतर अखेर आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी गुन्ह्यातील २ आरोपी तसेच १ विधीसंघर्षग्रस्त बालक हे दापोली पोलीस स्टेशन हद्दीतील कर्धे बीच परिसरात दिसुन आल्याने त्यांना पकडण्यात सदर तपास पथकास यश आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे करीत आहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जानचे खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग श्री. गणेश कि, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन, रमेश गर्जे, सपोनि भुईज पोलीस स्टेशन, पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उप-निरीक्षक रामदीप भंडारे व सहकार्यांनी सदरची कारवाई केली आहे.