खवले मांजर तस्करीप्रकरणी एकाला जामीन

खेड:- मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिरासमोर खवले मांजर तस्करी प्रकरणात सहभाग असलेल्या अनिल धोंडिराम जाधव (नागाव-महाड, जि. रायगड) यास येथील प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला.

खवले मांजर तस्करीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने आतिष सोनावणे (रा. तुळशी बुद्रुक बौद्धवाडी) याच्या मुसक्या आवळल्या होत्या. चौकशीअंती अनिल धोंडिराम जाधव व राजेंद्र रघुनाथ मोरे या दोघांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तुळशी-खिंडीजवळ दोघांनाही जेरबंद करण्यात आले होते. तिघांची एक दिवसाची वनकोठडी पुन्हा संपल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आतिष सोनावणे, अनिल जाधव यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.