रत्नागिरी:- शहरातील खडपेवठार येथे गावठी हातभट्टीची दारू गैरकायदा, बिगर परवाना चोरटी दारू विक्रीच्या उद्देशाने आरोपी महेश मधुकर पाटील (50 वर्षे) याच्याकडे आढळून आल्याने त्याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. 11 मे रोजी शहरातील खडपेवठार येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या बांधाच्या आडोशाला आरोपी महेश मधुकर पाटील (वय 50 वर्षे) गावठी हातभट्टीची दारू गैरकायदा बिगर परवाना, चोरटी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने 450 रुपयांचा एक 10 लिटर मापाचा प्लास्टिक कॅनसह आढळून आला आणि त्यात सुमारे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळली. त्यानुसार आरोपी विरोधात 11 मे रोजी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) प्रमाणे रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.