खंडाळा येथे विनापरवाना दारूची विक्री करणाऱ्या वृद्धाविरोधात गुन्हा 

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा बाजारपेठ येथे विनापरवाना विदेशी दारुची विक्री करणार्‍या वृध्दा विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7.45 वा.करण्यात आली.

महेश ताराचंद शहा (58,रा.वाटद खंडाळा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित वृध्दाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस शिपाई कुलदिप दाभाडे यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,शनिवारी वाटद खंडाळा बाजापेठेतील एका दुकानाच्या मागील बाजुस विनापरवाना विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहिती जयगड पोलिसांना मिळाली.पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून 2 हजार 155 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारु अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.