रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर कोणतीही नियमित ट्रेन धावत नाही. सध्या सुरु केलेल्या गाड्या कोव्हिड काळात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्पेशल ट्रेन आहेत. त्या नियमित चालणा-या गाड्यांच्या वेळेत चालतात, पण त्यांचे थांबे व अंतिम गंतव्य स्थान वेगळे आहे. कोकणवासीयांना सोईचा, स्वस्त, जलद व सुरक्षित वाहतुकीचा पर्याय म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर सध्या सुरू असलेली दादर सावंतवाडी दादर ही मुबई- कोकणातील प्रवाश्यांच्या सुविधेकरीता सुरू असलेली कोव्हिडं स्पेशल ट्रेन आहे. मार्च महिन्यात कोरोनाची तीव्रता वाढू लागल्यानंतर देशभरातील रेल्वे वाहतुकीच्या बरोबरीनेच कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वहातुक बंद झाली.मात्र मुंबई आणि कोकणातील लोकांची गैरसोय होऊ नये याकरीता कोकण रेल्वेकडून दादर-सावंतवाडी-दादर हि कोव्हिड स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली. यापूर्वी नियमीत ट्रेन वहातुक सुरू असताना दादर सावंतवाडी दरम्यान
धावणा-या तुतारी एक्स्प्रेस या गाडीचा क्रमांक 11003 – 11004 असा होता, आणि सध्या सुरू असलेल्या कोव्हिडं स्पेशल ट्रेन पहिल्या दिवसापासून 01003-01004 कोव्हिड स्पेशल या नावाने सुरू आहे. नियमित तुतारी ट्रेनचे काही थांबे देखील ही गाडी घेत नाही. ही ट्रेन पूर्णपणे आरक्षित असून या गाडीच्या डब्यांची संख्या व प्रकार वेगळे आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर सध्या धावत असणारी कोणतीही नियमित ट्रेन नाही. या सर्व ट्रेन्स कोव्हिड काळात लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता स्पेशल आहेत. त्या नियमित चालणा-या गाड्यांच्या वेळेत चालतात पण त्यांचे थांबे, अंतिम गंतव्य स्थान वेगळे असू शकते. तुतारीच नव्हे, तर अन्य नियमित ट्रेन्स देखील जशा जशा सुरु होणार आहेत. त्याप्रमाणे त्यांच्या नावा नंबरानिशी त्यांची घोषणा केली जाईल