कोविडसह सर्व रुग्णांना युवासेनेतर्फे दिवाळी फराळ

सव्वा तिनशे जणांना वाटप; तुषार साळवी, अभि दुडेची संकल्पना

रत्नागिरी:- युवासेनेतर्फे दिपावलीच्या पुर्वसंध्येला जिल्हा शासकीय रुग्णालयासह कोविड सेंटरमधील सुमारे सव्वा तिनशे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ, उटणे पाकिट वाटप करण्यात आले. तालुका युवा अधिकारी तुषार साळवी आणि शहर युवाधिकारी अभि दुडे यांच्यासह युवासैनिकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली फराळ वाटप युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरु केली. दिवाळी हा आनंदाचा क्षण, मात्र घरातील नातेवाईक उपचारासाठी रुग्णालयात असेल तर या आनंदातील उत्साह कमी होतो. अभ्यंगस्नान, फराळ यांचा काहीच मेळ होत नाही. अशा या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांची दिवाळी जिल्हा रुग्णालयातच साजरी होते. या लोकांसाठी युवासेना सरसावली आहे. कोरोना कालावधीत युवासेनेने जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत खिचडी वाटप सुरु केले होते. अनेक सामाजिक उपक्रमात युवासेनेचा सहभाग असतो. यंदा उद्योजक अण्णा सामंत यांनी दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्याची संकल्पना युवासैनिकांपुढे मांडली होती. ती दिवाळीच्या पुर्वसंध्येला युवासैनिकांनी अमलात आणली. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील 250 जणांना तर कोविड रुग्णालयातील 70 जणांना फराळ देण्यात आला. या कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, सुहेल मुकादम यांच्यासह युवासेनेचे तुषार साळवी, अभि दुडे, प्रथमेश साळवी, सुभान मालगुंडकर, मेहुल जैन, रोहित मायनक, लोभस देसाई, गुरु फाटक, अफक मुकादम, आशू तोडणकर, अनिकेत चव्हाण आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते.