कोळकेवाडी धरणात बेपत्ता सुजयचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

चिपळूण:- कोळकेवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपेकी दोघांना ग्रामस्थांनी वाचविले, तर अन्य दोघेजण बेपत्ता होते. त्यातील ऐश्वर्या खांडेकर या तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला, तर यातील बेपत्ता सुजय गावठे याचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला.

तीन दिवसांपूर्वी कोळकेवाडी धरणात सायंकाळी पाचच्या सुमारास चार युवक पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कालव्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील चौघेजण पाण्यात बुडू लागले. यावेळी तेथील आरडाओरडा ऐकून स्थानिक धनगर बांधव तसेच कोळकेवाडीतील काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेत त्यातील दोघांना वाचविले. मात्र, सुजय गावठे व ऐश्वर्या खांडेकर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महाड
येथील साळुके वॉटर रेस्क्यू टीमयांनी ऐश्वर्या खांडेकरचा मृतदेह शोधून काढला. मात्र, सुजय घावटे त्याचा थांगपत्ता लागत नव्हता गेले. दीड दिवस महाड साळुके रेस्क्यू टीम, चिपळूण न.प.चे स्पीड बोट कोळकेवाडी धरणात शोध घेत होते. मात्र, त्यांना अपयश आल्याने ती माघारी परतली. शनिवारी सुजय गावठे याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. त्या नंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात अलोरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्घटनेत मृत्यू ओढवलेला सुजयचे वय अवघे ३१ होते. तो इंजिनियरिंगची पदवीधारक होता. त्याला मोटार रायडिंग तसेच पोहण्याचा छंद होता. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.