रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे येथील आंबा बागेत अज्ञात कारणातून अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 30 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 6.30 वा. कालावधीत घडली आहे.
कविता टिकाराम थापा (11,मुळ रा.जि.कैलाली नेपाळ सध्या रा.कोळंबे,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ही आंबा बाग यतीन दामले यांच्या मालकीची असून ती विभव अभय पटवर्धन यांनी कराराने घेतलेली आहे. या बागेत या अल्पवयीन मुलीने अज्ञात कारणातून आंब्याच्या कलमाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.