रत्नागिरी:- रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. कोळंबे-परचुरी पुलावरून पाणी गेल्याने परचुरी गावाचा संपर्क तुटला आहे.
बुधवारी सकाळी बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली. बावनदीच्या पुराचे पाणी कोळंबे-परचुरी पुलावरून वाहू लागले. कोळंबे-परचुरीला जोडणारा पुलच पाण्याखाली गेल्याने परचुरी गावाचा संपर्क तुटला होता. परचुरीतील अनेक ग्रामस्थ गावात अडकून पडले आहेत.
बावनदीसह काजळी नदीला देखील पूर आला आहे. चांदेराई बाजारपेठ आणि काही घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच सोमेश्वर आणि अन्य भागात देखील पुराचे पाणी वाढत चालले होते.