कोळंबे नदीत बुडालेल्या प्रौढाचा मृतदेह गोळप येथे आढळला

रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे येथील नदीत वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह गोपळ येथे मिळून आला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविंद्र कृष्णा भाटकर (48, रा. नवेदरवाडी, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. बुधवार 26 जुलै रोजी रात्री 9.15 वा.रविंद्र भाटकर हे कोळंबे येथील नदीत वाहून गेले होेते. ही बाब तेथील ग्रामस्थांना समजताच त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू रात्रीची वेळ असल्याने त्यांचा शोध घेण्यात अडथळे निर्माण होत होते. दरम्यान,गुरुवार 27 जुलै रोजी सकाळी रविंद्र भाटकर यांचा मृतदेह गोळप येथील नदीकिनारी मिळून आला. याबाबत पूर्णगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.