कोरोना बाधित रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात मोठी घट

मृत्यूसंख्या देखील घटली

रत्नागिरी:- तब्बल सहा महिने लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात केवळ 26 बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची घालणारी आकडेवारी जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरणारी आहे.
 

जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी जिल्ह्यात केवळ 35 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आणखी घट झाली. मागील 24 तासात केवळ 26 बाधित रुग्ण सापडले आहेत. सापडलेले 26 रुग्णांपैकी खेड 1, गुहागर 1, चिपळूण 2, संगमेश्वर 5, रत्नागिरीत 16 आणि राजापूर तालुक्यात 1 रुग्ण सापडला आहे. तसेच 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मयत रुग्ण दापोली तालुक्यातील आहे.
 

मागील चोवीस तासात 92 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आता पर्यंत 42 हजार 472 हवा निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी 50 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आता पर्यंत 7 हजार 215 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.46 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 3.67 टक्के आहे.