विवाह सोहळा मर्यादित स्वरूपात
संगमेश्वर:- सर्व महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती पसरलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील श्री मार्लेश्वर देवस्थान यात्रोत्सव सोहळा शासनाच्या आदेशानुसार फक्त मानकरी लोकच विवाह सोहळ्यात सहभागी होऊन साजरा करतील हा विवाह सोहळा साखरपा येथील श्री देवी गिरीजीमाते बरोबर १४ जानेवारी २०२१ रोजी संपन्न होणार आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर होणारा हा यात्रोत्सव यावर्षी मर्यादित स्वरूपात फक्त सर्व मानकरी कुटुंबिय यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात येईल. अशी माहिती शेट्ये कुटुंबीय साखरपा व मार्लेश्वर देवस्थान यांनी दिली.
भाविकांच्या होणा-या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांना नम्र विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री मार्लेश्वरला नमस्कार व आपलं सांगण सांगाव तो आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. असे आवाहन सर्व मानकरी मंडळींनी केले आहे.
या यात्रा उत्सवात सर्व दुकानासह एस टी महामंडळाकडून बस सेवा बंद असणार आहे. प्रथेनुसार विवाह सोहळा होईल. तीन दिवस चालणारा हा सोहळा साखरपा, देवरूख, मुरादपूर, आंगवली व मारळसह सर्व ३६० मानकरी आपली जबाबदारी घेवून मर्यादीत उपस्थितीत सर्व विधी पार पाडतील यावेळी अन्य भाविकांना यात सहभाग घेता येणार नाहीये याची नोंद सर्वांनी घेवून मार्लेश्वर ट्रस्ट, सर्व मानकरी. व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन हि करणेत आले आहे