रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान मंगळवारी (ता. 5) करण्यात येणार आहे. रेल्वेच्या मालमत्ता देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या एकूण पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान 5 सप्टेंबरला दुपारी 12:20 ते सायंकाळी 3.20 असा तर सेनापुरा ते ठोकुरदरम्यान दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्या कोईमतूर-जबलपूर ही 4 सप्टेंबरला प्रवास सुरू होणारी एक्सप्रेस मडगाव ते चिपळूण दरम्यान सुमारे 90 मिनिटे रोखून ठेवली जाईल. सावंतवाडी रोड दिवा जंक्शन एक्सप्रेस ही 5 सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी सावंतवाडी ते चिपळूण दरम्यान 90 मिनिटे थांबवून ठेवली जाईल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस 5 सप्टेंबर रोजी कोलाड ते वीर दरम्यान सुमारे 30 मिनिटे थांबवून ठेवली जाईल.