रत्नागिरी:- मुंबई ते रत्नागिरी रेल्वे प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने असलेला बटवा अज्ञाताने लांबवला.याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार,13 मे रोजी ती पतीसह मुंबई सेंट्रल बस स्थानकातून (एमएच-08-एपी-5895) मधून रत्नागिरीत येत होती.रात्री 12.30 ते 1 वा.कालावधीत पेणला गाडी जेवणासाठी थांबली होती.त्यावेळी बसमधील काही प्रवासी जेवणासाठी उतरले व काही प्रवासी एसटीतच थांबलेले होते.या कालावधीत महिला व तिचे पती लघुशंकेसाठी एसटीतून उतरले होते.त्यानंतर इतर प्रवासी जेवण करेपर्यंत ते गाडीच्या बाहेर थांबले होते.काही वेळाने इतर प्रवासी आल्यानंतर एसटी पुन्हा रत्नागिरीच्या दिशेने निघाली.महिला परटवणे येथील आपल्या घरी आल्यानंतर 18 मे रोजी प्रवासातील बॅगेतील कपडे धुण्यासाठी उघडली असता त्यामधील बटवा तिला मिळून आला नाही.आपला कापडी बटवा चोरीस गेल्याचे लक्षात येताच तिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.