चिपळूण:- कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या कोचिवली सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील प्रवाशाची बॅग चोरट्याने पळवली. यातील सुमारे २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ४ जुलैला ही घटना घडली. १० ऑक्टोबरला येथील पोलिसात याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, केशर रमाकांत मंगेशकर (वय ६२, रा. गोवा) हे मुंबई ते गोवा कोचिवली सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करत होते. चिपळूणच्या जवळ आल्यानंतर त्यांना झोप लागली. २४ हजार रु. किमतीचे तीन मोबाईल असलेली बॅग त्यांच्याजवळ होती. रेल्वे सावर्डे येथे क्रॉसिंगला थांबली होती. या दरम्यान, चोरट्याने त्यांची बॅग पळवली.