कोटीची घोळ फाडून गेली डोल

रत्नागिरी:- रत्नगिरीतील मिरकरवाडा येथील दर्वे यांच्या बोटीला गुरुवारी तब्बल तीन टन घोळ मासा लागला. समुद्रात सोडलेली डोल ओढत असताना घोळ मासा जाळ फाडून बाहेर पडला. जवळपास एक कोटींची घोळ मासळी जाळ्यात होती. मात्र जाळं फाटल्याने हातात केवळ 65 हजारांचीच मासळी उरली.
 

मिरकरवाडा येथील दर्वे यांची नौका गुरुवारी पहाटे मासेमारीसाठी बाहेर पडली. सकाळी लवकर डोल समुद्रात सोडण्यात आली. या डोलीला बंपर घोळ मासा लागला. याचा विडिओ देखील बनवण्यात आला. जवळपास तीन टन इतकी घोळ जाळ्यात सापडली. मात्र क्षमतेपेक्षा अधिक मासळी जाळ्यात आल्याने जाळं फाटलं आणि घोळ मासा जाळ्यातून बाहेर पडून गेला. हाती केवळ 40 किलो घोळ आली. जेटीवर 1 हजार 650 रुपयाने हा मासा विकला गेला. घोळ मासा अत्यंत दुर्मिळ समजला जातो. याचा औषधी वापर केला जातो.