कोकण रेल्वे मार्गावर 16 गणपती विशेष गाड्या धावणार 

रत्नागिरी:-गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरील या आधी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्‍ल झाल्याने मध्य तसेच पश्‍चिम रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवरुन  गुरुवारी रात्री कोकणसाठी 16 गणपती विशेष गाड्यांच्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

नव्याने जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये मुंबई सीएसटी-सावंतवाडी (01235/01236), पनवेल -सावंतवाडी (01237/01238), लो. टिळक टर्मिनस – मडगाव (01239/01240),  लो. टिळक टर्मिनस-कुडाळ (01241/01242),  पनवेल – कुडाळ (01243/01244), पनवेल – कुडाळ (01245/01246),  पुणे – मडगाव (01247/01248),  पनवेल – करमाळी (01249/01250),  मुंबई सेंट्रल – सुरतकल (09183/09184), मुंबई सेंट्रल -मडगाव (09185/09186), वांद्रे  टर्मिनस – मडगाव (09187/09188), वांद्र टर्मिनस – कुडाळ (09189/09190),  वांद्र टर्मिनस –  मडगाव (09191/09192),  उधना  (सुरत)  – मडगाव (09067/09068),  अमहमदाबाद  -कुडाळ (09418/09417), विश्‍वमित्री (बडोदा)-कुडाळ (09150/09149) या सोळा मार्गांवर या गाड्या जाहीर करण्यात आला आहे. पुढील महिन्यात गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. या गाड्यांशिवाय आधी जाहीर करण्यात आलेल्या 8 विशेष गाड्यांच्या फेर्‍या वाढण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारच्या कोव्हीड 19 संदर्भातील नियमावलीचे पालन करीत या गाड्या चालवणल्या जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी लोकेंद्रकुमार वर्मा यांनी दिली आहे.