रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर क्लोन स्पेशल ट्रेन धावणार आहे. एर्नाकुलम ते ओखा दरम्यान धावणार्या एक्स्प्रेससारखी त्याच मार्गावर दुसरी ट्रेन धावणार असल्याने या गाडीला रेल्वेने ‘क्लोन स्पेशल’ गाडी म्हटले आहे.
यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एर्नाकुलम जंक्शन ते ओखा दरम्यान साप्ताहिक धावत असलेल्या सध्याच्या गाडीसारखीच दुसरी गाडी (06438/37) धावणार आहे. दि. 14 फेब्रुवारीपासून 25 एप्रिलपर्यंत ही गाडी एर्नाकुलमहून दर रविवारी सायंकाळी 7 वाजता 35 मिनिटांनी सुटणार असून गुजरातमधील ओखा स्थानकावर ती तिसर्या दिवशी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासात ही गाडी (06437) ओखाहून दि. 17 फेब्रुवारीपासून 28 एप्रिलपर्यंत दर बुधवारी सायंकाळी 6 वा. 45 मिनिटांनी सुटून दुसर्या दिवशी रात्री 11 वा. 55 मिनिटांनी एर्नाकुलमला पोहोचेल. ही गाडी दोन थ्री टायर वातानुकूलित, स्लीपर 11, सेकंड सीटिंग 4 तर एसएलआर दोन अशा 19 डब्यांसह धावणार आहे. संपूर्ण प्रवासात ही गाडी सुरतकल, उडपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड, भटकल, होनावर, कारवार, मडगाव, थीवी, कणकवली, रत्नागिरी, माणगाव ही स्थानके देत पनवेल, वसई रोड, वापी, सुरतमार्गे गुजरातमधील ओखापर्यंत धावणार आहे.