रत्नागिरी:- सिंधुदुर्गातील आंगणेवाडी जत्रेसह शिमगोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेली लोकमान्य टिळक टर्मिनस- सुरतकल ( मंगळूर ) साप्ताहिक स्पेशल ३ फेब्रुवारीपासून कोकण मार्गावर धावू लागली आहे. १७ डब्यांची ही स्पेशल ३१ मार्चपर्यंत धावणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता सुरतकल येथे पोहोचेल . परतीच्या प्रवासात ४ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत दर शनिवारी धावणारी ही स्पेशल सुरतकल येथून सायंकाळी ७.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात पोहोचेल जामनगर – तिरुनेलवेली ला एक डबा वाढवला कोकण मार्गावरून धावणाऱ्या जामनगर – तिरुनेलवेली एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले . १९५७८ / १९५७७ क्रमांकाची जामनागर -तिरुनेलवेली एक्सप्रेस ३ फेब्रुवारी व परतीच्या प्रवासात ६ फेब्रुवारी रोजी एक स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्यांची धावणार असल्याने गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे .