कोकण रेल्वेमार्गावर बुधवारी मेगा ब्लॉक

रत्नागिरी:- कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी रोड विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी तीन तासांचा मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावरील रेल्वेसेवेवर परिणाम होणार आहे. हा मेगा ब्लॉक बुधवारी (ता. २३) रोजी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत असेल.

तीन तासांचा मेगाब्लॉक असल्याने गाडी क्र. ११००३ दादर ते सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान दोन तासांनंतर नियमित केली जाईल. तसेच गाडी क्र.१६३४६ तिरुवनंतपूरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक (टी.) एक्स्प्रेसचा प्रवास मंगळवारी (ता. २२) उडुपी ते कणकवली विभागादरम्यान पहाटे तीनला नियमित केला जाईल. गाडी क्र.१०१०६ सावंतवाडी रोड – दिवा जंक्शन ही गाडी बुधवारी सावंतवाडी रोड ते कणकवली विभागादरम्यान अर्ध्या तासासाठी थांबवून नंतर नियमित केली जाईल.