रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना गुंगीचे औषध देवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 7 एप्रिल 2023 रोजी मडगांव नागपूर स्पेशल एक्स्प्रेस मध्ये गाडीत घडली. यापकरणी ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे 7 एप्रिल 2023 रोजी कोकण रेल्वे मार्गावरील मडगांव नागपूर स्पेशल एसीसेम जीनसत्त्वाच्या गाडीने प्रवास करत होते. आरक्षित डब्यामधून तक्रारदार प्रवास करत असताना समोरील सीटवर बसलेल्या दोघांनी त्यांच्याशी ओळख करून घेतली. यावेळी ओळखीचा फायदा घेत तक्रारदार यांना शीतपेय व वेफर्स खाण्यासाठी दिले. यानंतर तक्रारदार यांना झोप लागली असता, अज्ञात दोन्ही इसमांनी तक्रारदार यांच्याकडील मौल्यवान वस्तूंची चोरी केली. अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.