कोकण रेल्वेचे खासगीकरण करू नये: खा. राऊत

रत्नागिरी:- कोकण रेल्वेचे खाजगीकरण करु नये अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत  यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. रेल्वेच्या खाजगीकरणाला प्रचंड विरोध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार राऊत हे सध्या दिल्लीत असून कोकणचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारकडून कोकण रेल्वेचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे वृत्त पुढे येत आहे. कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. ती सध्या केआरसीएलद्वारे (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमेटेड) च्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. खाजगीकरणानंतर कोकणवासीयांना त्याचा फायदा होणार नाही. एकप्रकारे हा कोकणवासीयांवर अन्याय ठरेल. याला कडाडून विरोध होत असून केंद्र शासनाने याची दखल घेतली पाहीजे, असे त्या निवेदनात नमुद केले आहे.