कोकण नगर मार्गावर जुगार चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय ते कोकणनगर जाणार्‍या रस्त्यावर बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.50 वा.करण्यात आली असून यात 3 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आसिफ फकरुद्दीन काद्री (58, रा.कोकणनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी शहर पोलिसांना चर्मालय येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार,पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता संशयित हा बेकायदेशिरपणे कल्याण मटका जुगार खेळ चालवता दिसून आला. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकणू 3 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.