रत्नागिरी:- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी अघाडीतील तिन्ही पक्षांना आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे . तशी चर्चा महाविकास आघाडी करताना झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी जिल्हा पक्ष विस्तार करत असेल तर त्यामध्ये चूकीचे काहीही नाही. येत्या काही दिवसात कोकणात मोठा राजकिय धमाका होणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील राष्ट्रवादी, भाजपचे कार्यकर्ते , नेते व लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ‘आमची पण तारिख ठरलेयं’ असा सुचक इशारा शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना . उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी, भाजपला दिला आहे.
मिशन युवा स्वास्थ अभियानाच्या शुभारंभासाठी ना . सामंत रत्नागिरीत आले होते . यावेळी नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . येणाऱ्या निवडणूका स्वबळावर कि आघाडी करुन लढायच्या हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील . मात्र पक्ष वाढवायला कोणत्याही अटीशर्थी नाहीत . राज्यातील प्रत्येक भागात प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे . त्याप्रमाणे प्रत्येकजण आपआपले काम करित आहे . शिवसेनेतही राष्ट्रवादी , भाजपमधील लोकप्रतिनिधी , नेते प्रवेश करणार आहेत . येत्याकाही दिवसात कोकणातील तिन्ही जिल्ह्यात आपण राजकिय धमाका करणार असल्याचे ना . सामंत यांनी सांगितले .
तर दि . १६ नोव्हेंबरला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे ना . सामंत यांनी सांगितले . राज्य शासनाच्यावतीने राज्यभरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत लक्ष देण्यात येत आहे . यासाठी मिशन युवा स्वास्थ्य अभियान राबविले जात आहे . त्याला रत्नागिरी जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे . लसीकरणा बाबत आपल्या मित्र – मैत्रिणींमध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण करून घेणे आवश्यक आहे . जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत आपण प्रयत्नशील आहोत . आठ नव्या ऑक्सीजन युनिटसह डायलेसिस युनिट कार्यान्वित करण्यात येणार आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव संपला तरीही नियमित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात जावे लागू नये त्यांना ग्रामीण भागातील रूग्णालयात ऑक्सीजन उपलब्ध व्हावा या उद्देशाने प्लांट सुरू करण्यात आले आहेत . यापुढे रत्नागिरीतून उपचारासाठी बाहेर जायला लागू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत . चांगले वैद्यकीय अधिकारी पॅरामेडिकल स्टाफ लवकरच नियुक्त केला जाईल असेही ना . सामंत यांनी सांगितले .
जिल्हा नियोजन मधून महिला बचत गटांसाठी रत्नागिरी शहरात सरस हे विक्री प्रदर्शन भरवण्यात येणार आहे . तर पालिकेच्या ताब्यातील गाळ्यांमध्ये महिला बचत गटांचे विक्री केंद्र सुरू केले जाईल . त्यामध्ये ग्रामीण भागातील पालकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्याने प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी आपण पालिकेला उपलब्ध करून दिला आहे . पालिकेने नविदा प्रक्रिया सुरू केली असून भविष्यात लवकरात लवकर हा प्रकल्प उभारला जाईल . दांडेआडोम येथील स्थानिकांच्या शंकांचे निरसन करून उपलब्धतेनुसार त्यांना या प्रकल्पात रोजगाराची संधी देण्यात येणार असल्याचे ना यांनी सांगितले . तर खाजगी विमान वाहतुकीसाठी महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे . आवश्यक ५० एकर जागा धरमसिंग चव्हाण यांनी भाडेतत्त्वावर देण्याचे मान्य केले आहे . महाराष्ट्र विमान प्राधिकरण त्यांच्याशी चर्चा करत असून लवकरच हा विषय मार्गी लागेल त्यानंतर वर्षभरात रत्नागिरी तून विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना . उदय सामंत यांनी केली