कोकणनगर येथील तरुणीची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील मजगाव रोड-कोकणनगर येथील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावना सतकुमार चौधरी (वय १६, रा. मजगावरोड, कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) दुपारी पावणे एकच्या सुमारास कोकणनगर येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुणीने कोणत्यातरी अज्ञात कारणातून रहात्या घराच्या बाजूला असलेल्या बाथरुमच्या हुकाला नायलॉनची ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून दुपारी दोनच्या सुमारास मृत घोषित केले.