रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर आणि मिरकरवाडा येथे दोघांची तब्बल १,९७,७३८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकणनगर येथील फिर्यादीच्या मोबाइलवर अज्ञाताने फोन करून क्रेडिट कार्डबाबत माहिती दिली. त्यानंतर टेक्स्ट मेसेजद्वारे एक लिंक पाठवून ओपन करण्यास सांगून फिर्यादीच्या क्रेडिट कार्डची माहिती घेत ९८, २५९ रुपये काढून घेतले. मिरकरवाडा येथील व्यक्तीलाही अज्ञाताने अशाच प्रकारे फसवल्याचा प्रकार घडला आहे. एक लिंक पाठवून त्यात माहिती भरून घेतली आणि त्यांच्या खात्यातून ९९ हजार ४७९ रुपये काढून घेतले.