कोंडगाव येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

साखरपानजीक कोंडगाव-बाईंगवाडीतील घटना;
मृतदेह पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

संगमेश्वर:- तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडीतील राकेश मनोहर सावंत या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची खळबळजनक घटना साखरपा बाईंगवाडी येथे घडली आहे.खून करून मृतदेह सुमारे सहाशे मीटर लांब ओढत नेऊन शिंदेवाडी नजीकच्या शेवरपऱ्यात पाण्यात नेऊन टाकण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

  देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार याबाबतची फिर्याद प्रवीण तुकाराम सावंत (53) यांनी दिली आहे.कोंडगावचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांना घटना कळताच त्यांनी साखरपा पोलीस दुरक्षेत्राला सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला.

 दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी प्रवीण यांचा पुतण्या राकेश मनोहर सावंत (वय 36) यांच्या डोक्यात दगड घालून अज्ञातांनी खून केला.त्या नंतर मृतदेह घराजवळून  सुमारे सहाशे मीटर लांब ओढत नेऊन शेवरपऱ्यात पाण्यात नेऊन टाकला. पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने पाण्यात टाकण्यात आला असावा असे दिलेल्या फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

 ही घटना सोमवारी दुपारी तीन ते मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.राकेश याचा खून कोणत्या करणातून झाला आणि कोणी केला त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सद्या कोणतीच कारणे पुढे आलेली नाहीत.

 खुनाचे वृत्त कळताच गावात एकाच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीनिवास साळोखे , देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप ,उपनिरीक्षक विद्या पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर, सचिन भुजबळराव, विश्वास बरगाळे, संतोष सडकर,वैभव कांबळे, सचिन पवार, महिला कॉन्स्टेबल अर्पिता दुधाने  यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

अज्ञात खुन्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302,201 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप करीत आहेत.