कोंडगाव तिठा येथे अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- ट्रक निष्काळजीपणे चालवून अपघात करुन स्वतःसह क्लिनरच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम अरुण कांबळे असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास कोंडगाव तिठ्ठा (ता. संगमेश्वर) पासून अलिकडे २ किमी अंतरावरील वळणावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक ट्रक (क्र. एमएच-१० डीटी ८६८६) हा देवरुख ते साखरपा मार्गे सांगली असा जात असताना कोंडगाव तिठ्यापासून अलिकडे सुमारे दोन किलोमिटर अंतरावर वळणार निष्काळजीपणे ट्रक चालविल्यामुळे अपघात झाला. या अपघातात ट्रक ८० फुट दरीत जावून स्वतःसह क्लिनरला दुखापत झाली. तसेच वाहनाचेही नुकसान झाले. या प्रकरणी विशाखा वसंत कदम यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.