रत्नागिरी:- शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेते आजपासून ४ नोव्हेंबर २०२३ या तीन दिवसाचा कडकडीत बंद पाळणार असून नवीन विधेयके प्रस्तावित झाली आहेत त्यातील जाचक अटींना विरोध करण्यात येणार आहे.
कृषी निविष्ठाविक्रेते हा शेतकर्यांचा मित्र असून शेतकर्यांया अडी अडचणी मध्ये सहाय्य तसेच मार्गदर्शन करत असतो .कृषी केंद्रामध्ये येणारा खते, बी बियाणे, कीटकनाशके याची तपासणी उत्पादक पातळीवर कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून केली जाते . नंतरच सीलबंद वेष्ठनातून कृषी सेवा केंद्र चालक विक्री करत असतात तरीसुद्धा प्रस्तावित विधेयक क्रमांक ४०, ४१, ४२, ४३ आणि ४४ यामध्ये जाचक अटींचा अंतर्भाव असून विक्रेत्यांना विक्री केलेल्या निविष्ठांमध्ये काही अनियमितता आढळून आल्यास त्यास विक्रेत्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
कृषी निविष्ठा सीलबंद असून त्या खरेदी करून शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी सेवा केंद्र करत असतात त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांचा जबाबदार धरण्यात येऊ नये या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हा बंद पाळण्यात येणार आहे. प्रस्ताविक विधेयकामध्ये विक्रेत्यांवर झोपडपट्टी गुंड वाळू माफिया यांना लावण्यात येणारी कलमे लावून शिक्षा देण्यात येणार आहे शासनाने अलीकडेच कृषी सेवा केंद्र चालकाला कृषी पदवीधर असल्याशिवाय परवाना मिळत नाही असे आदेश काढले आहेत. मग जर अशा प्रकारची विधेयके आणून कायद्याअंतर्गत कृषी सेवा केंद्र चालकांना सजा देण्यात येणार असेल तर नवीन कृषी पदवीधर या व्यवसायामध्ये कसे पडतील. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र व सहकारी संस्था यांचा या बंदमध्ये सहभाग असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी संघटना यांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिलेला आहे. इतर कृषी क्षेत्रातील संघटना सुद्धा बंदला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत.
शेतकरी बांधवांना होणार्या गैरसोयीची जाणीव आपल्याला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्री बाबा दळी यांनी सांगितले आहे. परंतु हा कायदा आल्यास कृषी सेवा केंद्र चालवणे मुश्कील होणार असल्यामुळे नाईलाजाने हा बंद करावा लागत आहे.