कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन उर्फ आबा पाटील यांचा राजिनामा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन उर्फ आबा पाटील यांनी आपल्या पदाचा नुकताच राजिनामा दिला आहे. गजानन उर्फ आबा पाटील यांच्या राजीनाम्याने राजकिय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मात्र या पदाची मुदत संपल्याने त्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

गजानन उर्फ आबा पाटील यांच्या राजीनाम्या नंतर या सभापतीपदी सुरेश सावंत आणि संदीप सुर्वे यां दोघांमध्ये चुरस असल्याचे बोलले जात आहे. लवकरच सभापती निवड होण्याची शक्यता असून सभापतीपदी रिगणात आता कोणाची वर्णी लागते ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान आबा पाटील यांनी आपल्या सभापतीपदाचा राजिनामा हा आठवडा पूर्वीच दिला असल्याचे बोलले जात आहे.