कुवारबाव येथील अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कुवारबाव सिंचन भवन रस्त्यावर झालेल्या दुचाकी आणि रिक्षा यांच्यातील अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार कानादी मोरे (रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

अपघाताची ही घटना ३० मार्च दुपारी दीडच्या सुमारास पाटबंधारे ऑफिसच्या जवळ रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावरील एसटी बस शेड समोर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मोरे हे दुचाकी (क्र। एमएच-४६ एएस ८८०५) घेऊन हातखंबा हुन कुवारबाव सिंचनभवन समोरील एसटी बस शेड समोर आला असताना दुचाकीचा विमा नसताना निष्काळजीपणे दुचाकी चालवून रिक्षा (क्र. एमएच-०८ के ३७५९) वरील चालक संदेश मारुती चव्हाण (वय ६५, रा. जुवे, रत्नागिरी) यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक संदेश चव्हाण यांच्यासह स्वतः जखमी झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.