कुवारबाव पोलीस चौकी शेजारीच मोबाईल शॉपी फोडली; लाखोंचा माल लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजिक कुवारबाव पोलीस चौकी जवळच असलेली मोबाईल शॉपी गुरुवारी रात्री चोरट्यानी फोडली. मोबाईल शॉपीतील 50 किमती मोबाईल चोरट्याने चोरून नेले. जवळपास 50 लाखांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मँगोस मोबाईल शॉपी असे चोरी झालेल्या मोबाईल शॉपीचे नाव आहे. आठ दिवसांपूर्वीच या मोबाईल शॉपीचे उद्घाटन झाले होते. गुरुवारी रात्री चोरट्यानी ही शॉपी फोडत किमती मोबाईल चोरून नेले. मोबाईल शॉपीच्या दुकानाचा एकच चिरा काढत आत प्रवेश करून ही चोरी करण्यात आली. शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड घटनास्थळी दाखल झाले असून तपासकाम सुरू झाले आहे.