कुंभार्ली घाटातील अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- गुहागर ते विजापूरला जाणार्‍या कारला कुंभार्ली घाटात काल मंगळवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. कारवरील ताबा सुटल्याने कार सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळली. यात चिपळूणातील सेवानिवृत्त उपअभियंता शंकर दिनकरराव भिसे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अश्विनी दिग्विजय रासकर (32, सातारा) या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

याबाबतची फिर्याद अश्विनी रासकर यांनी अलोरे शिरगाव चिपळूण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार कार चालक मयत शंकरराव भिसे यांच्यावर भादविकलम 304 (अ), 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.