किसान मोर्चातर्फे रत्नागिरीत धरणे आंदोलन

रत्नागिरी:- शेतकरी विरोधातील काळ्या कायद्याविरोधात राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. रत्नागिरीमध्ये किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सोमवारी (ता. 11) धरणे आंदोलन करण्यात आले.

भाजपा सरकारने शेतकरी विरोधी तीन अध्यादेश काढले आहेत. कोरोना महामारीतील टाळेबंदीत बोलावण्यात आलेल्या लोकसभा अधिवेशना चर्चा न करताच विधेयक पास करण्यात आले. या कायद्यामुळे शेतकरी, मजदूर परिवारांना फायदा होणार नाही. सर्व अधिकारी मोठ्या व्यावसायिकांच्या हाती जाणार आहेत. शेतकर्‍यांसाठीचा कायदा कायम रद्द होणार आहे. भारतीय खाद्य निगमशी निगडीत कर्मचारी, अधिकारी यांच्या रोजी-रोटीवर परिणाम होणार आहे. ही भाजपची चाल असून सामान्य माणसालाच फटका बसणार आहे. शेतकरी विरोधी हा कायदा रद्द करण्यासाठी किसान मजदूर मोर्चाच्या माध्यमातून दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. याला जोड देण्यासाठी देशव्यापी जन-आंदोलन करण्यात येत आहे. 11 ते 17 जानेवारी या कालावधीत हे आंदोलन करण्यात येणार आहे. रत्नागिरीत झालेल्या धरणे आंदोलनात बाळा कचरे, अशोक पवार, अभय आग्रे, दिपक आग्रे, केरु आग्रे सहभागी झाले होते.