किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन

रत्नागिरी:- उद्योजक किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात हजारों हितचिंतकांनी गर्दी केली होती. तासन्तास कार्यकर्ते, मित्रपरिवार, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि हितचिंतकांनी केलेली गर्दी पाहता किरण सामंत यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती असल्याच्या प्रतिक्रिया याठिकाणी उमटत होत्या.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, सिंधुरत्न समृध्द योजनेचे सदस्य किरण सामंत यांचा 7 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात रत्नागिरी जिल्ह्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केवळ कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हितचिंतकांनी गर्दी केली होती.

किरण सामंत यांनी यापूर्वीदेखील कोणतेही पद नसताना समाजासाठी, दुर्बल व वंचित लोकांसाठी तसेच कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींना नेहमी अडीअडचणीत मदत करतात. कोणत्याही अडचणी घेवून भैय्यांकडे गेल्यानंतर जागेवरच त्यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देणारे व्यक्तीमत्व म्हणून भैय्यांकडे पाहिले जाते.

शनिवारी दुपारपासूनच भैय्यांना शुभेच्छा देण्यासाठी शासकीय व़िश्रामगृह येथे नागरिकांनी गर्दी केली होती. याच दिवशी रात्री 12 वाजता अनेकांनी केक आणून त्यांचा वाढदिवस साजरा केला. रविवारी पहाटेपासूनच मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील हितचिंतकांनी भेटीसाठी हजेरी लावली होती.

वाढती गर्दी लक्षात घेता याठिकाणी वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले होते. किरण सामंत यांना शुभेच्छा देणार्‍या लोकांची गर्दी पाहता रत्नागिरी सिंधुदूर्गची उमेदवारी किरण सामंत यांनाच जाहीर होणार अशी मोठी चर्चा रविवारी रत्नागिरीत होती.