दापोली:- तालुक्यातील इनामपांगरी सुतारवाडी येथे किरकोळ कारणावरून मारहाण झाल्या प्रकरणी सुमारे १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा देवघरकर यांच्या घरात २२ रोजी संध्या. ७ च्या सुमारास एक महिला तिच्या समवेत नवनीत देवघरकर व त्याची पत्नी हे तिघेजण मनीषा देवघरकर यांच्या घरात घुसून लोखंडी सळई व चिरीव जाड चौकोनी लाकडाने मारहाण करून दुखापत केली. नवनीत देवघरकर याने मनीषा हिचा
सुमारे २१००० किमतीचा मोबाईल फोडला. घराच्या बाहेरील बाजूस संजय रामचंद्र देवघरकर, भागोजी पांडुरंग देवकर, सोबत दोन महिला तसेच जगदीश विश्राम देवघरकर चंद्रकांत गोविंद देवघरकर हे घराच्या बाहेर आले असता संजय याने मनीषा हिला मारण्यास सांगून कंपाउंडला लावलेले सिमेंटचे पत्रे व घराचा दरवाजा लाथ मारून तोडला. त्या ठिकाणी लावण्यात आलेला सुमारे भागोजी देवघरकर याने घराच्या कंपाऊंडचे सिमेंटचे पत्रे फोडले त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने कोर्टातील दावे परत घे, असे सांगून मनीषा व तिच्या आईला काठीने मारहाण केली.
तसेच जगदीश विश्राम देवघरकर याने मनीषा व तिच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली. नवनीत देवघरकर याने एका महिलेच्या सहाय्याने मनीषाचा हात धरून फरफटत नेले व इतर हरिश्चंद्र सावरटकर, सुभाष देवघरकर यांनी हिचा कारभार कायमचा संपवून टाका असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारामारीमध्ये मनीषा यांचा कुर्ता व तिच्या आईची साडी फाडून नुकसान केले त्यावेळेला सुरेश देवघरकर याने यांना ठार मारण्याची धमकी दिली. दापोली पोलीस ठाण्यात सुमारे १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.