किनारपट्टीलगत असलेल्या भागांना वाढत्या तापमानाचा धोका कायम

रत्नागिरी:- समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वार्‍याची स्थिती निवळल्याने कमाल तापमानात वाढ कायम राहण्याबरोबरच उकाड्यात वाढ हाण्याची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याचीही तीव्रता निवळली असल्याने किनारपट्टीलगत असलेल्या भागांना वाढत्या तापमानाचा धोका कायम राहणार आहे.

कोकण किनारपट्टी भागात वादळाच्या प्रभावाने आलेली मळभी स्थिती ओसरल्यानंतर आता उन्हाचा दाह वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्रतविली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता रत्नागिरी जिल्ह्याच्या विवध भागात 37 अंशापेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तर सोमवारी रात्री किमान तापमानही सरासरीच्या तुलनेत दोन ते 3 अंशाने वाढल्याने उकाड्याचे प्रमाण वाढले.
वाढत्या तापमाने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अद्याप बिगर मोसमीसह मोसमी पावसाची शक्यता आठवडाभर नसल्याने या आढवड्यासह पुढच्या आठवड्यात उष्म्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सकाळी आठ वाज्यल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा तापदायक ठरू लगाल्या आहेत. उकाड्यात वाढ झाल्याने उष्माघाताने आरोग्यावर प्रतिकूल परिणामाची शक्यता आरोग्य विभघाने व्रतविली आहे. किनारी भागातही सागरी पाण्याच्या बाष्मीभवनाच्या प्रक्रियेत तिव्रता आल्याने किनारी गावतही उकाड्याच्या प्रमाणात वाढीची शक्यात आहे.
सोमवारी रत्नागिरीत कमाल तापमान 38 अंश सेल्सियस नोंदविले होते. मंगळवारी यामध्ये दुपारच्या सत्रात वाढ झाल्याची नोंद झाली आहे. सकाळी 37 वर असलेला पारा दुपारी दोन अंशाने वधारलेला राहिला.