रत्नागिरी:- बोटीवरील वृद्ध खलाशी झोपलेला होता त्याची हालचाल होत नसल्याने तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
देवजा महादेव तांडेल (वय ६०, कासारवेली, रत्नागिरी) असे मृत खलाश्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून
मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार हे मतीन दानियाल या बोटीवर मासेमारीसाठी गेले होते. बोटीवरील खलाशी देवजा हा बोटीत झोपलेला होता. त्याची हालचाल होत नसल्याने तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वृद्ध खलाशी देवजा यास तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.