रत्नागिरी:- शहराजवळील काळबादेवी येथे दीड हजार रुपयांची विदेशी दारु विक्रीसाठी बाळगली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ताराम वासुदेव मयेकर (वय ६६) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास काळबादेवी-भोळेवाडी-फडजीवाडी येथील नारळाच्या झाडाखाली निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे विदेशी दीड हजार रुपयांची दारु सापडली. या मध्ये ५४० रुपयांची व ३०० रुपयांची विदेशी दारुच्या बाटल्या व ६६० रुपयांचा बिअर आदी मुद्देमाल सापडला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार सुनिल सावंत यानी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.