रत्नागिरी:- शहरानजीकच्या काळबादेवी येथील सुरुबनात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अनिल बेंडू मयेकर (वय ६८, रा. काळबादेवी, मयेकरवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १९) रात्री साडे आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल मयेकर यांना दारुचे व्यसन होते. ते लॉन्चीवर मासेमारी करत बुधवारी ते घरी आलेले नाहीत म्हणून त्यांचा शोध घेतला असतान सायंकाळी पाचच्या सुमारास घराच्या पाठीमागे सुरुबन येथे उताणे झोपलेल्या स्थितीत आढळले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.