रत्नागिरी:- काळबादेवी हे निसर्गरम्य पर्यटन क्षेत्र असेले, विस्तीर्ण सागर किनारा लाभलेले गाव आहे. खार्या हवेमुळे बहुसंख्य विद्युत पोल अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांची बँकेट पुर्णत: गंजलेले आहेत. तसेच वर्षानुवर्ष वापरात असलेल्या विज वाहिन्या जिर्ण झाल्याआहे. त्या वारंवार तुटतात. त्या पुन्हा जोडून वापरल्या जातात. त्यामुळे विज वारंवार खंडीत होते. तसेच या जिर्ण तारा तुटल्यामुळे मनुष्यहानी होवू शकते. त्यामुळे गंजलेले खांब , विज वाहिन्या तात्काळ बदलण्याची मागणी शिवसेना शाखा प्रमुख श्री. संदेश देवजी बनप यांनी महावितरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.
काळबादेवी गाव कोतवडा येथील विज उपकेद्रअंतर्गत आल्यानंतर काळबादेवी वासियांना अखंडीत विज पुरवठा होईल अशी अपेक्षा होती. परंतु अजुनही नाचणे उपकेंद्र विज पुरवठा होत असल्याचे समजते. या पूर्वी वारंवार कोतवडे व जाकादेवी उपकेंद्रात पत्रव्यवहार करुनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.या अर्जाची शहानिशा करून योग्यतो जनहीताचा निर्णय घ्यावा अशी मागणी श्री. संदेश देवजी बनप यांनी केली आहे.