कारवांचीवाडी येथे कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक ; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- बेदरकारपणे कंटेनर चालवून पुढील दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी कंटेनर चालकविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास कारवांचीवाडी येथिल नुरानी गादी कारखान्यासमोर घडली. ताहीर नसरुद्दीन वस्ता (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी ) विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात शैलेश गोपाळ करंडे (रा. निवळी, रत्नागिरी ) हा दुचाकी चालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या अपघात प्रकरणी आदम अकबर नदाफ (20, रा. खेडशी, रत्नागिरी ) याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी ताहीर वस्ता आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच- 08-एच- 2358) घेऊन भरधाव वेगाने हातखांबा ते रत्नागिरी असा येत होता. त्याच सुमारास शैलेश करंडे हाही आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 10-सीएफ- 1275) घेऊन रत्नागिरीच्याच दिशेने येत असताना कंटेनरची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. हा सर्व प्रकार आदम नदाफने आपल्या दुकानात काम करत असताना पाहून ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.