रत्नागिरी:- काजूच्या बागेतील फार्म हाऊस घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने 40 हजाराचा मुद्देमाल पळविला. देवरुख पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 ते 4 ऑक्टोबरला सकाळी आठच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शैलेश शरदचंद्र जागुष्टे (वय 52, रा. ओझरे खुर्द, ता. संगमेश्वर) यांचे ओझर खुर्द येथे मुंडेकरवाडीकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्याला लागून काजूची बाग आहे. या बागेतील फार्म हाऊस अज्ञात चोरट्याने फोडून फार्म हाऊसमध्ये प्रवेश करुन ग्रास कटर व दोन चेनची सॉ मशीन असा 40 हजाराचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी जागुष्टे यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरुख पोलिस अमंलदार करत आहेत.