कशेडी घाटात ट्रक पलटी होऊन गाडीचा चक्काचूर; सुदैवाने चालक बचावला

खेड:- मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटात वेडीवाकडी वळणे आणि चढाव यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. मंगळवारी मध्यरात्री मालवाहू ट्रक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीचा ताबा सुटून मालवाहू ट्रक पलटी झाला. ट्रकचे तुकडे तुकडे झाले. एवढ्या मोठ्या अपघातात सुदैवाने चालक बचावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

सविस्तर वृत्त असे की, सुनील सोपान वाघमारे हा ट्रक चालक आपल्या ताब्यातील ट्रक घेवून गोव्याहून कल्याणच्या दिशेने जात होता. कशेडी घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या बाहेर पलटी होऊन त्याचे तुकडे तुकडे झाले. या अपघाताची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रक चालकाला उपचारासाठी दाखल केले.