कशेडी अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला धडक देऊन ५ जणांच्या दुखापतीसह वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हुंडाई कारचालक अकिल इस्माईल फणकर (४७, पाली-रायगड) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश रामदास पाटील हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (एम.एच. ४३-बी.ई. ८८८९) घेऊन नवी मुंबई येथून चिपळूण येथे जात होते. याचवेळी हुंडाई कारमधून (एम.एच.०६-सी.पी.२७२१) अकिल फणकर हा ५ प्रवाशांना घेऊन गोवा येथून मुंबईच्या दिशेने जात होता. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात हुंडाई कार उलटून कारमधील ५ जण जखमी झाले.त्यानुसार त्याच्यावर येथील पोलीस स्थानकात रविवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला.