चिपळूण:- शहरालगतच्या कळंबस्ते येथील एका घरात विकीसाठी ठेवलेला गांजासदृश पदार्थ पोलिसांनी शनिवारी धाड टाकून जप्त केला. 719 ग्रॅम वजनाच्या या गांजासदृश पदार्थची किंमत 21 हजार 600 रुपये होते. या प्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मनीष अमित नागवेकर (22) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात गांजासह गुंगीकारक पदार्थ जप्तीवर धडक कारवाई केली जात आहे. असे असतानाच शहरालगतच्या कळंबस्ते या ठिकाणी गांजासदृश पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलीस मनीष याच्या घरी गेले असता त्याने त्याच्या घरात एका पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या प्लास्टीक पिशवीत 719 ग्रॅम वजनी उग्र वास येत असलेली तपकिरी रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेल्या ओलसर गांजासदृश पदार्थ विकीसाठी ठेवल्यो दिसून आले. 21 हजार 600 रुपये किंमतीचा असणारा हा गांजासदृश गुंगीकारक पदार्थ पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मनीष याला अटक करण्यात आली असून त्याने हा गुंगीकारक पदार्थ कोठून आणला, याचा तपास पोलीस करत आहेत.