कर्ला येथे अज्ञाताकडून प्रौढाला मारहाण

रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला-खाडी येथे खेकडे पकडणाऱ्या प्रौढाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. मिर्झा अलिमिया मिरकर (५०, रा. कर्ला, रत्नागिरी) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरकर हे कर्ला येथील खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी मासेमारी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोळ्यावर हाताच्या ठोशाने मारुन दुखापत केली. त्यांच्या डोळ्याला मार लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.