रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे सावकारी कर्जाचे व्याज न दिल्याच्या रागातून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारहाणीची ही घटना मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास घडली.
रोहन गजेंद्र शिर्के (रा.टिआरपी स्टॉपजवळ,रत्नागिरी) आणि एक अज्ञात या दोघांविरोधात नरेश विठोबा जाधव (42,रा.बौध्दवाडी सोमेश्वर,रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,नरेश जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी व्यवसायाकरता रोहन शिर्केकडून 40 हजार रुपये व्याजाने घेतले होते.परंतू लॉकडाउनच्या काळात त्यांचा व्यवसाय बंद असल्याने ते रोहनचे व्याज आणि मुद्दल देवू शकले नव्हते.
या रागातून मंगळवारी सायंकाळी रोहन आपल्या सोबत मित्राला घेउन जाधव यांच्या घरी गेला आणि त्या दोघांनी नरेश जाधव यांना हातांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 500 रुपये घेउन गेले.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.