रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे-पाचकु़डे येथील झऱ्याचे (डुऱ्याचे) पाणी दूषित करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश रमेश पाचकुडे (रा. उगवती पाचकुडेवाडी, करबुडे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २८ फेब्रुवारीला सायंकाळी सहाच्या सुमारास उगवती पाचकुडेवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा वाडीतील लोकांना काहींना काहीतरी करुन नेहमी त्रास देत असतो. वाडीतील लोकांनी डुऱ्याच्या पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळताना लोकांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी फिर्यादी सदाशिव गोविंद पाचकुडे (वय २१, रा. उगवती पाचकुडेवाडी, करबुडे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.