खेड:- खेड मधील बोरज येथे कंपनीतील एका कामगाराने ३५ लीटर डिझेल परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन लखनसिंग पाटीदार, संदीप कृष्णा घाटगे (४०, भरणेनाका, खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन लखनसिंग पाटीदार हा छाबड़ा मरीन या कंपनीत जनरेटरच्या देखरेखीसाठी कामाला होता . कंपनीने जनरेटरसाठी आणलेले ३५ लीटर डिझेल पाटीदार याने कॅन भरुन टेम्पो ट्रॅव्हल्स चालक संदीप घाटगे याला दिले. या डिझेलची किंमत ३३९५ रुपये आहे . ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी कंपनीचे रोनित अनिल ईनरकर (२९ . खेड) माने खेड पोलीस स्थानकात दिली . त्यानुसार पोलिसांनी अर्जुन आणि संदीप पांच्यावर भादविकलम ३७ ९ , ४११ , ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे . याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत .